Pay and Park Scheme : ठेकेदाराची माघार! ‘पे अॅण्ड पार्क’ योजना बारगळली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pay and Park Scheme) मोठा गाजावाजा करीत शहरात 20 ठिकाणी सुरु केलेली ‘पे अॅण्ड पार्क’ योजना गुंडाळण्याची वेळ आली आहे. परवडत नसल्याचे कारण देत या कामाच्या ठेकेदाराने माघार घेतली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महापालिकेला दिले आहे. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडावी, यासाठी वेगवेगळ्या योजना लागू करण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणजे शहरात ‘पे अॅण्ड पार्क’ योजना लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. शहरातील 396 ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याची तयारी महापालिकेने केली. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 80 ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. ‘पे अॅण्ड पार्क’साठी आवश्यक असलेले पट्टे रस्त्यावर मारण्यात आले. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले. ‘पे अॅण्ड पार्क’ असल्याची वाहन चालकांना माहिती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही उभारण्यात आले.

याबाबत निविदाही मागविण्यात आल्या. मात्र, या (Pay and Park Scheme) निविदांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आलेल्या ठेकेदारांपैकी निर्मला ऑटो केअर या संस्थेला ‘पे अॅण्ड पार्क’चे काम देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यांतील उत्पन्न आणि कर्मचारी वर्गावर होणारा खर्च पाहता ‘पे अॅण्ड पार्क’ चे काम आपल्याला परवडत नाही. आपण यातून माघार घेत असल्याचे पत्र निर्मला ऑटो केअर या कंपनीने महापालिकेला दिले आहे, तर काही ठिकाणचे ‘पे अॅण्ड पार्क’ यापूर्वीच ठेकेदाराने बंद केले आहे.

शहरात 396 ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याचे महापालिकेचे नियोजन

पहिल्या टप्प्यात शहरातील 80 ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात 20 ठिकाणीच ‘पे अॅण्ड पार्क’च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. कडक अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिसांना पाच टोईंग व्हॅन दिल्या होत्या. तरीही योजना बारगळली आहे.

महापालिका आणि ठेकेदाराचा 50-50 टक्के फॉर्म्युला

महापालिकेने ‘पे अॅण्ड पार्क’ चे सहा पॅकेज केले. यापैकी एक पॅकेज हे बीआरटी रस्त्यावर बिल्डरांकडून महापालिकेस दिलेल्या पार्किंगच्या जागेवर ‘पे अॅण्ड पार्क’ साठी जागा देण्यात आली आहे. उर्वरित पाच पॅकेजमध्ये पुणे-मुंबई रस्त्यावरील नाशिकफाटा ते निगडी, चापेकर चौक, टेल्को रोड, स्पाइन रोड, औध रावेत बीआरटी मार्ग, केएसबी चौक हिंजवडी (बिर्ला हॉस्पिटल जवळील मार्ग, ऑटो क्लस्टर काळेवाडी फाटा या 20 मार्गावर ‘पे अॅण्ड पार्क सुरू करण्यात आले. ‘पे अॅण्ड पार्क’ च्या मिळालेल्या पैशांतून 50 टक्के महापालिका आणि उर्वरित 50 टक्के ठेकदाराला देण्याचे ठरले. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली. ‘पे अॅण्ड पार्क’ला चालना मिळावी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांना कारवाईसाठी टोईंग व्हॅनही देण्यात आल्या होत्या.

PFI Banned In India : PFI वर पाच वर्षासाठी बंदी, केंद्र सरकारची मोठी कारवाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.