Hinjawadi : आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – सास-यासोबत आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेल्या सुनेचा मोबाईल दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी हिसकावला. ही घटना रविवार ( दि. 30) रात्री साडेनऊच्या सुमारास पुनावळे येथे घडली.

अंकिता विजय अग्रवाल (वय 28, रा. पांढरेवस्ती, पुनावळे ) या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता त्यांच्या सासऱ्यांसोबत रविवारी (दि. 30) रात्री साडेनऊच्या सुमारास आईस्क्रीम आणण्यासाठी गेल्या. मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे कडून वाकड पुलाकडे जाणा-या सर्व्हिस रोडने दोघेजण पायी जात होते. त्यावेळी ते शेल पेट्रोल पंपाजवळ आले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसका मारून चोरून नेला. यावरून त्यांनी सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.