Dehuroad : दिवाळीच्या बाजार खरेदीसाठी गेल्यानंतर चोरट्यांनी घर फोडले

एमपीसी न्यूजदिवाळीच्या बाजाराच्या खरेदीसाठी घर बंद करून बाजारात गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सहा वाजता विकासनगर येथे घडली.

सचिन शांताराम हबीब (वय 36, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 3) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हबीब दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घराला कुलूप लाऊन बाजारात गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी हबीब यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटातून 32 ग्राम वजनाचे 55 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हबीब खरेदीवरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.