Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये कर्मचा-यांची रॅपीड अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 68 पैकी 3 जण कोरोना संक्रमित (पाॅझीटीव्ह) आढळले. पॉझिटिव्ह आलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले असल्याचे उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी नगर परिषद पटलावर असलेल्या सर्व कर्माचा-यांनी ‘रॅपीड अँन्टीजेन टेस्ट’ करावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यास अनुसरून दि. 10 रोजी नगर परिषद कार्यालयामध्ये येथील सुगी पश्चात कोव्हीड केअर सेन्टरच्या माध्यमातून डॉ. पदमवीर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनीषा गावंडे, टेक्निशियन गौरी आसवले,व सहाय्यक रामदास डोळस यांनी नगर परिषद कर्माचा-यांची रॅपीड अँन्टीजेन टेस्ट  नगर परिषद कार्यालयात केली. यामध्ये केलेल्या रॅपीड अँन्टीजेन टेस्ट मध्ये एकून 68 पैकी 3 जण कोरोना संक्रमित (पॉझिटीव्ह) आढळले.

यामधील कोरोना संक्रमित (पॉझिटिव्ह) दोघांना सुगी पश्चात कोव्हीड केअर सेन्टर मध्ये विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले असून बाहेर गावाच्या व्यक्तीला त्याच्या परिसरातील कोव्हीड केअर सेन्टर मध्ये विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले असल्याची माहिती उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली. कार्यालयात काम करणा-या कर्मचा-या मधून रॅपीड अँन्टीजेन टेस्ट मध्ये कोरोना संक्रमित (पॉझिटीव्ह) आढळल्यामुळे कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.