YCMH News : वायसीएम नॉन कोविड रुग्णांसाठी सुरू राहणार

एमपीसी न्यूज –  कोरोनाच्या दोन्ही लाटेत वायसीएम रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. परिणामी इतर आजारांच्या रूग्णांची गैरसोय झाली होती. हा अनुभव लक्षात घेता. आता वायसीएम रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. इतर आजारांच्या रुग्णांचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना रुग्णांबरोबरच इतर आजारांच्या रुग्णांनाही उपचार द्यावा, अशा सूचना राज्य आणि केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसारच यंदा वायसीएम रुग्णालय सर्व आजारांच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

शहरात कोरोनाची पहिली लाट मार्च 2020 मध्ये आली होती. तेव्हा वायसीएम कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्या काळात इतर आजारांच्या रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तेव्हा महापालिकेने शहरातील दोन खासगी रुग्णालयांशी करार केला होता. इतर आजारांच्या रूग्णांची सोय दोन खासगी रुग्णालयात करण्यात आली होती. परंतु तरी देखील रूग्णांची गैरसोय झाली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेत पुन्हा वायसीएम राखीव ठेवण्यात आले होते.

परंतु, त्यावेळी अत्यावश्यक आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरु ठेण्यात आल्या होत्या. वायसीएम हे महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे शहराबरोबरच जिल्ह्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. इतर आजारांच्या रुग्णांसाठी वायसीएम सुरू ठेवल्याने सर्वच रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी महापालिका प्रशासन उपाययोजना करीत आहे. जम्बो कोविड केअर सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहे. इतर आजारांच्या रुग्णांचा विचार करता वायसीएम नॉन कोविड रुग्णांसाठी सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

कोरोनामुळे सर्वच रुग्णालयात काही आयसीयू बेड राखीव ठेण्यात येत आहेत. इतर आजारांचे जे रुग्ण दाखल असतात. त्यांची कोरोना तपासणी करण्यात येत असते. दाखल रुग्णांपैकी कोणत्या रुग्णांनाला कोरोनाची लागण झाली तर अशा रुग्णांसाठी एक विभाग राखीव ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.