Talegaon Dabhade News : मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज : सोमाटणे येथील ग्रामदैवत चौराई माता मंदिरातील दानपेटी बुधवार (दि.24) मध्यरात्रीच्या सुमारास  फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली. राकेश आप्पा मुऱ्हे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

अमोल यशवंत केदारी (वय 20), प्रतिक शंकर पानसरे (वय 21) व पूनम प्रतिक पानसरे (वय 20) सर्व (रा. ठाकर वस्ती परंदवडी ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमोल केदारी, प्रतिक  पानसरे व पूनम पानसरे यांनी सोमाटणे येथील ग्रामदैवत चौराई माता मंदिरातील दानपेटी  फोडण्याचा प्रयत्न केला.

हे आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने त्यांना पोलिसांनी पहाटेच्या दरम्यान ताब्यात घेतले. गुरुवार (दि.25) रोजी पोलीस आरोपी चोरट्यांना मावळ न्यायालयात हजर करणार आहेत.

15 दिवसांपूर्वी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला होता पण अंधार असल्याने चोरटे सापडले नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न करताना चोरटे सापडले आहेत. राकेश आप्पा मुऱ्हे म्हणाले चौराई माता मंदिर परिसरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.