गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Today’s Horoscope 16 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 August 2022
गुरुवार.
16.08.2022
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – पतेति.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – रेवती 21.07 पर्यंत नंतर अश्विनी.
चंद्र राशी – मीन 21.07 पर्यंत नंतर मेष.
—————————————-
आजचे राशिभविष्य – Today’s Horoscope 16 August 2022

मेष – (शुभ रंग- मरून)
आज रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा बराचसा वेळ फुकट जाईल. खर्च आवाक्‍याबाहेर जाईल महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. काहींचा आज गुढ शास्त्राकडे कल राहील.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
चैन करण्यासाठी आज हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. एखादा अनतेक्षित लाभ संभवतो. छान दिवस

मिथुन- ( शुभ रंग- गुलाबी)
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज व्यस्त दिवस असून फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

कर्क -(शुभरंग- पिस्ता)
नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.

सिंह-( शुभ रंग- पांढरा)
तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे. नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. सासुरवाडी करून एखादा धनलाभ होऊ शकतो. मोठे आर्थिक धाडस आज नको.

कन्या-( शुभ रंग- चंदेरी)
नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील.

तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. व्यापाऱ्यांची उधारी वसूल होईल. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा.

वृश्चिक – ( शुभ रंग – नारंगी)
महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील हाती असलेला पैसा जपून वापरा. आज प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु- ( शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

मकर- ( शुभ रंग- निळा)
परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.

कुंभ-( शुभ रंग- क्रीम)
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

मीन – (शुभ रंग- जांभळा)
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन 9689165424
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Vinayak Mete : विनायक मेटे यांना मावळ भाजपकडून श्रद्धांजली

spot_img
Latest news
Related news