Today’s Horoscope 17 August 2023 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – वार – गुरुवार. 17 ऑगस्ट 2023. (Today’s Horoscope 17 August 2023)

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस
  • आज विशेष – साधारण दिवस
  •  राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मघा 19.58 पर्यंत, नंतर पूर्वा फाल्गुनी.
  • चंद्र राशी – सिंह.

—————————————-

मेष – (शुभ रंग- पांढरा) (Today’s Horoscope 17 August 2023)

आज तुमचा हौस-मौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

वृषभ (शुभ रंग- निळा)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मिथुन (शुभ रंग- राखाडी)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकावे लागणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. शब्दांचा वापर जपूनच करा.

PMAY : आवास योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज 

कर्क (शुभ रंग- पिस्ता)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. अत्यंत उत्साही दिवस.

सिंह (शुभ रंग- हिरवा)

कार्यक्षेत्रात फायदेशीर असे नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना योग्य स्थळे सांगून येतील. आपले आवडते छंद जोपासाल. इतरांच्या भांडणात मध्यस्थी कराल.

कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

खर्चाचे प्रमाण कितीही वाढले तरी पैसा आज कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर आपल्या किमती वस्तूंची मात्र काळजी घ्या.

तूळ (शुभ रंग- आकाशी) (Today’s Horoscope 17 August 2023)

पूर्वी केलेल्या एका गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. आज दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.

वृश्चिक (शुभ रंग- मरून)

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची तुमची आज तयारी असेल.

Pimpri : एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये रंगले कला प्रदर्शन

धनु- (शुभ रंग- भगवा)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज थोडासा विरोधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मित अडचणींचा सामना करावा लागणार आहे

मकर (शुभ रंग- सोनेरी)

आज फक्त आपल्याच स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देण्याची गरज नाही. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी हळू चालवा.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्यायला हवे. हौस-मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क करा.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्यायला हवेत. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. आज हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचे आहे.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.