Today’s Horoscope 19 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – शुक्रवार 19 मार्च 2021

 

  • शुभाशुभ विचार — 14 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष — सामान्य दिवस.
  • राहू काळ – सकाळी 10.30ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृतिका 13.44 पर्यंत नंतर रोहिणी.
  • चंद्र राशी –  वृषभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष –  ( शुभ रंग- आकाशी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील. आज गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. आनंदी दिवस.

वृषभ – ( शुभ रंग- पांढरा)

तुमची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना स्थळे सांगून येतील. आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे.

मिथुन – ( शुभ रंग -मोरपिशी )

ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. आज देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत. आवाक्याबाहेर गेलेल्या खर्चावर लगाम अत्यंत गरजेचा आहे.

कर्क – ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केलेले कष्ट कारणी लागतील. व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ मिळेल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीकडून सुवार्ता येतील.

सिंह – ( शुभ रंग – डाळिंबी )

नोकरदारांना साहेबांच्या मागेपुढे करावेच लागेल. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा अजिबात बाळगू नका. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका.

कन्या –  ( शुभ रंग- सोनेरी )

कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. सत्संनाने  मानसिक बळ मिळेल. विदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना संधी चालून येतील.

तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)

आज काही नकारात्मक विचार मनात येतील काही क्षुल्लक गोष्टींनी ही राग अनावर होईल. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा. व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच गुंतवणूक वाढवा.

वृश्चिक –  ( शुभ रंग – सोनेरी)

महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. अशावेळी अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगले.

धनु – ( शुभ रंग- भगवा)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. घरासाठी काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.

कुंभ – ( शुभ रंग- क्रीम)

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.

मीन  – ( शुभ रंग- मरून)

ऑफिस कामासाठी काही जवळपास चे प्रवास होतील. प्रॉपर्टीचे व्यवहार आज नकोत. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा न ठेवलेलीच बरी. काही महत्वपूर्ण मेल्स येतील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.