Today’s Horoscope 20 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 20.11.2023.

शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला दिवस. 

आज विशेष – दुर्गाष्टमी.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – धनिष्ठा 21.26 पर्यंत नंतर शततारका.

चंद्र राशी – मकर 10.08 पर्यंत नंतर कुंभ.

—————————–

मेष ( शुभ रंग – डाळिंबी)

क्षुल्लक मतभेदांमुळे दुरावलेले मित्र सुसंवादाने जवळ येतील. आज जसे चिंताल तसेच होईल. त्यामुळे आज फक्त शुभ चिंता. पूर्वी केलेली गुंतवणूक लाभ देईल.

वृषभ ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही रिकामटेकडी चर्चा टाळून फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गास वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. मित्र आज तुम्हाला चुकीचे सल्ले देतील.

मिथुन  ( शुभ रंग- केशरी)

ज्येष्ठ मंडळींना संततीकडून शुभ समाचार येतील. आज तुमचा अध्यात्माकडे कल राहील. घरात देवकार्य करण्याचे बेत आखाल. घरातील मोठ्यांचा मान राखावा लागेल.

कर्क  ( शुभ रंग – पिस्ता)

आज आपल्या कुवतीबाहेर कोणतीच रिस्क घेऊ नका. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळायला हवा. सासुरवाडी कडून आज लाभ संभवतो. पत्नीच्या होला हो करा.

सिंह ( शुभ रंग – लाल)

व्यवसायात भागीदारांशी एक मत राहील. आज वैवाहिक जीवनातही सामंजस्याची भावना असेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुमचा प्रयत्न असेल.

कन्या ( शुभ रंग-जांभळा)

नोकरदारांना कामाचे तास वाढवावे लागतील. कोणतीही गोष्ट आज सहज साधन नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. आरोग्याची मात्र काळजी घ्या.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

नोकरीच्या ठिकाणी त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज तुमच्या मौज मजा करण्याचा मूड असेल. सहकुटुंब चैन कराल. प्रेम प्रकरणांना थोरांचे आशीर्वाद मिळतील.

वृश्चिक ( शुभ रंग – राखाडी)

आज तुम्ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चेतच जास्त रमाल. कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याचा तुमचा मूड राहील. गृहिणींचे गृह उद्योग आज तेजीत चालणार आहेत.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज घराबाहेर वावरताना डोके थंड व वाणित गोडवा असू द्या. काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील मोफत सल्लागार मंडळींच्या हो ला हो करा व वादविवाद टाळा.

मकर (शुभ रंग- मोतिया)

व्यापार उद्योगात मिळकत मनाजोगती असेल. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करता येतील. आप्तस्वकीय तुमच्या शब्दाला मान देतील. गोड बोलून इतरांची मने जिंकाल.

कुंभ  (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही काही से लहरीपणाने वागाल. तुमच्याकडून काही आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुणालाही मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

मीन ( शुभ रंग- आकाशी)

तुमच्या कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. काही जणांना तातडीच्या प्रवासाला निघावे लागेल. केवळ भिडस्तपणा पायी न परवडणारा खर्च अजिबात करू नका.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.