Today’s Horoscope 21 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 21 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार

21. 03. 2023 .

 शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.

 आज विशेष- दर्श अमावास्या.

 राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30. 

 दिशा शूल – उत्तरेस असेल.

 आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा १७.२६ पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा

 चंद्र राशी – कुंभ 11.57 पर्यंत नंतर मीन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- जांभळा )

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले गवसेल.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र आज तुमचा शब्द झेलतील. दिवसाचा पूर्वार्ध लाभाचा.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात काही तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते.

कर्क (शुभ रंग- पिस्ता.)

आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. दुपारनंतर अनुकूल दिवस.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. सदैव सज्ज रहा.

कन्या ( शुभ रंग- मरून)

अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज घराबाहेरही तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणे असतील तर ती मात्र आज वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

कलेच्या क्षेत्रात नवोदित मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध असेल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

धनु- (शुभ रंग- लाल)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकवणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे आयोजन करतील.

मकर ( शुभ रंग- मोतिया )

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. मुलांनी आई-वडिलांच्या अज्ञात राहावे.

कुंभ (शुभ रंग – भगवा)

एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. उपवरांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. अतिउत्साहाच्या भरात तुम्ही आज काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. संयमाने वागा.

मीन -(शुभ रंग – निळा )

खर्च कितीही वाढला असला तरी पैशाची उणीव भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणे अनपेक्षित पणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती करावी लागेल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.