Sangvi : पोलिसांचे दुर्लक्ष होताच जॅमरसह दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – ‘नो पार्किंग’मध्ये पार्क केलेल्या दुचाकीला वाहतूक पोलिसांनी जॅमर लावले. पोलिसांचे लक्ष दुसरीकडे जाताच दुचाकीस्वाराने  जॅमरसह दुचाकी पळवून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 20) नाशिकफाटा उड्डाणपुलावर सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

वाहतूक पोलीस श्रीराम तुकाराम मांजरे (वय 32, रा. सांगवी ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी वाहतूक विभागाच्यावतीने नाशिकफाटा ते सांगवीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान ‘नो पार्किंगमध्ये’ पार्क केलेल्या एका दुचाकीला ( एमएच.14 / सीए 9781) पोलिसांनी जॅमर लावले.  जॅमर लावून पोलीस दुसरीकडे गेले. एवढ्यात दुचाकीस्वाराने डाव साधत जॅमरसह दुचाकी पळवून नेली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.