Pune News : भारतरत्न प्राप्त पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार, 48 भारतरत्नांच्या चित्रांचे अनावरण

एमपीसी न्यूज : स्त्री शिक्षण क्षेत्रातील योगदान देणारे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या ‘भारतरत्न’प्राप्त (Pune News) पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

मधुरे इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा. लि. च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कुटुंबातील मीना आनंद कर्वे, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे आणि पं. भीमसेन जोशी यांच्या कुटुंबातील लक्ष्मी जयंत जोशी आणि शुभदा मुळगुंद हे सदस्य सहभागी झाले होते.  त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

पुण्याजवळील सणसवाडी (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप येथे ‘जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा. लि.’ कंपनीच्या 390 मीटर लांब भिंतीवर सर्व 48 भारतरत्नांचे (Pune News) चेहरे स्वखर्चाने रेखाटून मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा. लि. ने भारतरत्न प्राप्त महनीय व्यक्तींना प्रजासत्ताकदिनी अनोखी मानवंदना दिली.

Dehuroad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी भंडारा डोंगराला भेट देणार

‘जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग’कंपनी चे संचालक अंकीत हांडा, प्रकल्पाचे वास्तुविशारद मयूर वैद्य, पी. एन. सप्रे, ओंकार कुलकर्णी, अजितकुमार पाटील, मुख्याध्यापिका मंगल वाजे, स्वाती बेंडभर या वेळी उपस्थित होत्या. उमेश मधुरे आणि सुनीता मधुरे यांनी स्वागत केले. दीपक बीडकर यांनी सूत्रसंचालन केले.

भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार या महान पुत्रांना त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या त्यांच्या असिम त्यागाला , समर्पित वृत्तीला , निस्वार्थ भावनेला , ध्येयवेड्या आदर्शाला , (Pune News) त्यांच्या उत्तुंग व उल्लेखनीय कार्याला स्मरुन दिला जातो. या सर्व महान व्यक्तींच्या घरातील सदस्यांचे समर्पण , त्याग , सहन केलेल्या अवहेलना , कष्ट व त्यांची सोबत याची माहिती सर्वाना व्हावी. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.