Chikhali Crime News : तलवार आणि चाकू बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – तलवार आणि चाकू बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. मोरेवस्ती, चिखली येथे शनिवारी (दि.16) चिखली पोलिसांनी ही कारवाई केली.

लखन उर्फ लक्ष्मण बसवराज गाडेकर (वय 24, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) आणि रूपेश प्रमोद ठाकूर (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस नाईक नरहरी सदाशिव नाणेकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश असताना, आरोपींनी एक तलवार आणि एक चाकू जवळ बाळगला होता. दोघांना अटक केली असून, चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.