Mhalunge Crime News : हातावर चाकू मारून मोबाईलची चोरी, सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी कामावरून घरी जात असलेल्या दोघांना धमकावले, तसेच एकाच्या हातावर चाकू मारून मोबाईल चोरी केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. आंबेठाण रोड, आंहबेठाण, खेड येथे बुधवारी (दि.13) रात्री 1 वा. ही घटना घडली.

याबाबत समिर प्रभुदास कापगते (वय 22, रा. आंबेठाण, खेड) यांनी चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सहा अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ कामावरून घरी जात होते. त्यावेळी सहा आरोपी दुचाकीवरून तिथे आले व त्यांना धमकावू लागले. दोघांना मारहाण करून खिशातील सर्व पैसे बाहेर काढा नाहीतर मारून टाकतो अशी धमकी दिली. एका आरोपीने फिर्यादीचा भाऊ याच्या हातावर चाकू मारून त्याच्या हातातील 8000 रूपये किंमतीचा मोबाईल चोरी केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण (म्हाळुंगे) पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.