Chakan Crime News : गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – टपरीमध्ये आणि किराणा दुकानामध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री करताना दोघेजण आढळले. टपरी चालक आणि किराणा दुकान चालकाला अटक करत त्यांच्यासह चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 26) दुपारी सव्वाएक वाजता महाळुंगे परिसरात करण्यात आली.

पवनकुमार माताराज शर्मा (वय 21, रा. फडकेवाडी, चाकण. मूळ रा. मनेहु, ता. मानधाता, जि. प्रतापगड), मुलचंद पन्नालाल परमार (वय 43, रा. फडकेवस्ती, निघोजे रोड, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अनिल मौर्या (रा. फडकेवस्ती, चाकण), अभिषेक गुप्ता (रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवनकुमार याची विकास पान टपरी नावाची टपरी आहे. त्यात आरोपीने 49 हजार 671 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला विक्री करताना आढळून आला. त्याने हा गुटखा आरोपी अभिषेक याच्याकडून आणला होता.

अभिषेक याचे जय तुळजाभवानी किराणा नावाचे दुकान आहे. त्यात पोलिसांना एक लाख 15 हजार 543 रुपयांचा गुटखा आढळला. दोन्ही ठिकाणी एकूण एक लाख 65 हजार 214 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.