Pune News : दोन महिन्यानंतर ‘असा’ लागला फोटोग्राफरच्या हत्येचा छडा

एमपीसी न्यूज : दौंड येथील फोटोग्राफर केदार उर्फ पिंटू श्रीपाद भागवत यांचा दोन महिन्यांपूर्वी खून झाला होता. दौंड जवळील लिंगाळी गावच्या हद्दीत भागवत यांचा मृतदेह सापडला होता. या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींनी चौकशीदरम्यान हा खून केल्याची कबुली दिली. 

ओमकार उर्फ काका गावडे (वय 21), राजेश बिबे (वय 19), अजय पवार (वय 19) आणि आटोळे (वय 24) विशाल आटोळे  अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार केल्याचे कबूल केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी दौंड जवळील लिंगाळी गावच्या हद्दीत डोक्यात वाटले आणि दगड मारुन श्रीपाद भागवत यांचा खून करण्यात आला होता. केदार भागवत हे दौंड मधील प्रसिद्ध फोटोग्राफर होते. दौंड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होते.

दरम्यान वरील सर्व आरोपी ना एका जबरी चोरीच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासा भागवत खून प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. यातील आरोपी बीबीए आणि पवार या दोघांनी मिळून दौंड मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला चोरीच्या उद्देशाने मारण्याचे कबूल केले. आणि यातूनच पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या शोध पथकाने भागवत खून प्रकरणाचा छडा लावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.