YCM Hospital : वायसीएम रुग्णालयाच्या मागील रस्त्यावर ऑइल सांडल्याने दुचाकींचा अपघात

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाच्या (YCM Hospital) मागील रस्त्यावर ऑइल सांडल्याने दोन ते तीन दुचाकी स्लिप होऊन पडल्याची घटना आज सकाळी घडली. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे सारंग मंगलुरकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना मंगलुरकर, म्हणाले की आज सकाळी एका अग्निशमन कर्मचाऱ्याने पिंपरी मुख्यालयात येत असताना पाहिले, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या मागील रस्त्यावर ऑइल सांडले आहे. या ऑइलमुळे दोन ते तीन दुचाकी वाहने स्लीप होऊन पडल्या होत्या. या दोन ते तीन दुचाकीस्वारांना या कर्मचाऱ्यानी त्यांच्या दुचाक्या रस्त्याच्या बाजूला करण्यास मदत केली.

World Wildlife Week : ‘लंम्पी’ रोगाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे : चंद्रकांत शेटे

त्या कर्मचाऱ्यांनी याबाबत मुख्यालयात फोन करून सकाळी सव्वा दहा वाजता कळविले. त्यामुळे एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आला होता. त्यांनी रस्त्यावरील ऑइल साफ केले व पुढील होणारे अपघात टळले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.