मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022

Vaccination News : भारतात 20 कोटी 33 लाख नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. भारतात एकूण 80 कोटी नागरिकांनी लस घेतली असून, त्यापैकी 20 कोटी 33 लाख 25 हजार 881 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, 60 कोटी 03 लाख 94 लाख 452 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध आकडेवारी नुसार, भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अत्तापर्यंत देशात 80 कोटी 43 लाख 72 हजार 331 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 85 लाख 42 हजार 732 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनादिवशी (शुक्रवारी, दि.17) जवळपास अडीच कोटी लोकांनी लस घेतली. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामुळे यादिवशी आजवरचे सर्वाधिक लसीकरण नोंदविण्यात आले.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढविली जात आहे. गेल्या 24  तासांमध्ये एकूण 15,59,895 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.23 कोटींहून अधिक (55,23,40,168) चाचण्या घेतल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढविण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.04 % असून गेल्या 86 दिवसांपासून हा दर 3 % पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.97 % असून गेले सलग 20 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 103 दिवस हा दर 5 % पेक्षा कमी आहे.

spot_img
Latest news
Related news