CORBEVAX News : बारा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील पाच हजार 204 मुलांच्या लसीकरणाची मोहीम तालुका पातळीवर सुरू करण्यात आली आहे तसेच 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोसचे लसकवच देण्यास शासनाने मान्यता दिल्याने त्यांचेही लसीकरण सुरू झाले आहे.

केंद्र शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार दि 16 मार्च 2022पासुन CORBEVAX लस 12 ते 14 या वयोगटातील म्हणजेच 2008, 2009, 2010 या वर्षात जन्म असलेल्या सर्व बालकांसाठी तसेच COVISHIELD/COVAXIN 60 वर्षापुढील सर्वांसाठी बुस्टर/तिसऱ्या डोसचे लसीकरण सूरु होत आहे. 12 ते 14 वयोगटातील सुमारे 5204 इतके उद्दिष्ट लसीकरणासाठी आहे.

12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याचे/ लाभार्थ्याचे लसीकरण या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष शाळेत जाऊनच सुरू करण्यात आले आहे. शाळानिहाय कृती आराखडा बनवून लसउपलब्धतेनुसार पुढील पंधरा दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल याबाबत आरोग्य विभागाने संपूर्ण नियोजन केलेले आहे

12 ते 14 वयोगटातील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे तसेच पालकांनी देखील मुलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.60 वर्षावरील सर्व व्यक्तींनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभाग मावळ तर्फे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.