Vadgaon Maval : विद्यार्थ्यांसाठी न्यू इंग्लिश स्कुलमध्ये लसीकरण मोहिमेस प्रारंभ

एमपीसी न्यूज – शासनाने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले आहे. मुलांचे अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी शाळांमध्ये लसीकरण अभियान राबवावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथे पंचायत समिती आरोग्य विभागाच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कुल येथे विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

या लसीकरण मोहिमेचे उदघाटन मावळ पंचायत समितीचे मा सभापती गुलाबराव म्हाळसकर व शालेय शिक्षण समितीचे सदस्य मनोजभाऊ ढोरे यांचे हस्ते करण्यात आले.
केंद्र सरकारच्यावतीने व पंचायत समिती आरोग्य विभागाचे सहकार्याने 03 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम सुरू केली आहे

आज मंगळवार (दि 04) जानेवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल वडगांव मधील 600विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला,पहिल्यांदाच लस घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर म्हणाले की कोरोनामुळे गेल्या दिड वर्षांच्या कालखंडात शाळा बंद होत्या,अलीकडच्या महिनाभरापासून शाळा सुरू झाल्यामुळे, केंद्रशासनाचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे,त्यापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार याची काळजी शिक्षक वर्गाने घ्यावी असी सूचना करण्यात आली.

पंचायत समिती आरोग्य विभागाच्या डॉ स्मिता पालवे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रज्ञा कुंभार व दैवशाला बढे या विद्यार्थ्यांना लस देत आहेत
या कार्यक्रम प्रसंगी वडगांव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे, शाळेचे पर्यवेक्षक पी बी कांबळे,अजय महामुनी,एस एम गायकवाड,नगरसेवक रविंद्र काकडे,माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, दिनेश मोरे,गणेश शेंडगे, प्रमोद म्हाळसकर,श्रीकांत चांदेकर आदीजन उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.