Vadgaon News : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समितीची नवीन कार्यकारीणी जाहीर

एमपीसी न्युज – वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार गणेश विनोदे यांची निवड झाली आहे. तसेच कार्याध्यक्ष पदी सदाशिव गाडे व कार्यक्रमप्रमुख पदी विवेक गुरव यांची निवड करण्यात आली आहे. (Vadgaon News) यंदा सोहळ्याचे दशकपूर्ती वर्ष असून यावर्षीचा सोहळा 16 एप्रिल रोजी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसह संपन्न होणार आहे.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन व नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी विलास दंडेल,राजेंद्र वहिले,अर्जुन ढोरे,अतुल राऊत, सुनील शिंदे,मंगेश खैरे,रोहिदास गराडे,शरद ढोरे,सोमनाथ धोंगडे,खंडू काकडे,महेश तुमकर,संतोष निघोजकर,विनायक लवंगारे,संजय दंडेल,गणेश झरेकर,दर्शन वाळुंज, कार्तिक यादव उपस्थित होते.

यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा 16 एप्रिल 2023 रोजी संपन्न होणार असून यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच जोडप्यांना संसारपयोगी भांडी, (Vadgaon News) लग्नाचा पोशाख,साड्या,वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन,नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. दि. 31 मार्च पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News : पुणे महापालिकेतर्फे ग्रंथ प्रदर्शन व काव्य स्पर्धेचे आयोजन

प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम गेली नऊ वर्षांपासून राबविण्यात येत असून सुमारे 150 जोडपी विवाहबद्ध झाले आहेत. यावर्षी सोहळ्याचे दशकपूर्ती वर्ष असून यावर्षीचा सोहळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसह साजरा करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश विनोदे,कार्याध्यक्ष सदाशिव गाडे व कार्यक्रमप्रमुख विवेक गुरव यांनी सांगितले.

गणेश विनोदे यांचा सामुदायिक विवाह सोहळा उपक्रम सुरू करण्यात महत्वाचा सहभाग असून गेली 20 वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष (Vadgaon News) म्हणून त्यांनी काम केले असून सामाजिक कार्याचा भाग म्हणून मावळ तालुक्यातील निवेदक म्हणून काम करणाऱ्यांना संघटित करून मावळ तालुका निवेदक संघाची स्थापना करण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

 

सामुदायिक विवाह सोहळा समिती नूतन कार्यकारिणी : 

गणेश विनोदे(अध्यक्ष),सदाशिव गाडे (कार्याध्यक्ष),विवेक गुरव (कार्यक्रमप्रमुख),शंकर ढोरे (उपाध्यक्ष), अक्षय बेल्हेकर (सचिव), अनिल कोद्रे (खजिनदार), महेश तुमकर (सहखजिनदार).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.