Vasant More : “त्याचा बाप वसंत मोरे आहे हे लक्षात ठेव”, मुलाला आलेल्या धमकीनंतर वसंत मोरे यांचा इशारा

एमपीसी न्यूज : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुपेश मोरे यांच्या गाडीवर ‘सावध राहा रुपेश’ असा मजकूर असलेली चिठ्ठी अज्ञात व्यक्तीने ठेवली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वसंत मोरे (Vasant More) हे आपल्या कामाने नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाचे निमित्त साधून वसंत मोरे यांनी कात्रज परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या धामधुमीत असतानाच हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने ही धमकी असलेली चिठ्ठी ठेवली आहे. यामध्ये सावध रहा रुपेश असा उल्लेख असल्याने एकच खळबळ उडाली. वसंत मोरे यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दिली आहे.. त्यामुळे ही चिठ्ठी कोणी लिहिली? हे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.

वसंत मोरे यांनी या सर्व प्रकारावर फेसबुक पोस्ट लिहून वाचा फोडली. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते काय म्हणाले ते पाहूया.

Moshi Fire Incident : मोशीमध्ये दोन स्मॅाल स्केल कंपन्यांना आग

”मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो. आमचेही अगदी तसंच आहे पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही. गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणी त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली. त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती. त्या दरम्यान कोणीतरी त्याच्या गाडीच्या वायपरमध्ये “सावध रहा रुपेश” अशी चिठ्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली. तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का?

हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा हे का? तेच कळत नाही भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत (तात्या) मोरे (Vasant More) आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.