Wakad : वाकड मधून बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलाचा आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – वाकड येथे राहत्या घराजवळून शनिवारी (दि. 24) आठ(Wakad) वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह रविवारी वाकड परिसरात आढळून आला. यामध्ये घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सलेमान राधेश्याम बरडे (वय 8, रा. पिंकसिटी रोड, वाकड) असे (Wakad)मृतदेह आढळलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी सहा ते आठ वाजताच्या कालावधीत सलेमान हा राहत्या घराजवळून बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी त्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

Pimpri : पर्यावरणा चा समतोल राखण्यासाठी सायकल हा उत्तम पर्याय – अमित गोरखे

त्यामुळे पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेते या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि मुलाचा शोध सुरू केला.
मात्र दुर्दैवाने रविवारी सलेमान याचा वाकड परिसरात मृतदेह आढळून आला. सलेमान याचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.