Wakad News: एका कार चालकाने घेतला दुस-या कार चालकाचा चावा

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाताना दोन कार चालकांचा वाद झाला. त्यातून एकाने दुस-या कार चालकाला चावा घेऊन दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि. 4) रात्री कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

स्वप्नील सुनील वैद्य (वय 31, रा. कावेरीनगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष कल्याण भोसले (रा. पाषाण, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कारमधून जात असताना त्यांच्या मागून आरोपी त्याच्या कारमधून आला. त्याने जोरजोरात हॉर्न वाजवल्याने फिर्यादी यांनी त्याला पुढे जाण्यास जागा दिली. पुढे जात असताना आरोपी फिर्यादी यांना शिव्या देऊ लागला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला ‘शिव्या का देतो’ अशी विचारणा केली. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांच्या कारच्या पुढे काही अंतर जाऊन फिर्यादी यांच्या कार समोर त्याची कार थांबवली. त्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करत हाताला जोरात चावा घेतला. यात फिर्यादी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपीने ‘तुझा मर्डरचा करतो’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.