Wakad : महिलेच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरावर पाळत ठेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 31) रात्री पावणेबारा ते बुधवारी (दि. 1) पहाटे दीड या कालावधीत वाकड येथे घडली.

प्रशांत कांबळे (रा. थेरगाव) आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरावर पाळत ठेवली. तसेच चोरून तिचा पाठलाग केला. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घराचा दरवाजा वाजवून तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.