Wakad : ताथवडे येथील लेबर कॅम्पवर तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – ताथवडे येथील कोहिनूर सफायर फेज 2 या( Wakad)बांधकाम साइटवरील लेबर कॅम्प मध्ये दोघांनी एका कामगार तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्रमोद रामचंद्र यादव (वय 23) असे खून झालेल्या तरुणाचे (Wakad)नाव आहे. वीरेंद्रकुमार रामचंद्र यादव (वय 19, रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लवलेश मलखान यादव, बिनय रामशरण यादव (दोघे रा. ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : निगडीत रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ प्रमोद यादव हा ताथवडे येथील कोहिनूर सफायर फेज 2 या बांधकाम साइटवर काम करत होता. तो बांधकाम साइटवरील लेबर कॅम्प मध्ये राहण्यास होता. तिथे संशयित आरोपी लवलेश आणि बिनय या दोघांनी प्रमोद याचा गळा आवळून खून केला. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.