MCA Cricket Stadium : MCA क्रिकेट स्टेडियमचे संत तुकाराम महाराज क्रिकेट स्टेडियम असे नामकरण करण्याची वारकऱ्यांची मागणी, थेट स्टेडियम मधून.

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) : मावळ तालुक्यातील गहुंजे येथे असेलेले महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या  स्टेडियमला संत तुकाराम महाराज स्टेडियम असे नामकरण करण्यात यावे हि मागणी मावळ तालुका वारकरी  संप्रदाय मंडळाने केली व काल दि.10 रोजी असंख्य वारकर्यांनी थेट स्टेडियममध्ये (MCA Cricket Stadium) सामना  पाहण्यासाठी येत याची मागणी केली. 

काल झालेल्या आयपीएलच्या गुजरात विरुद्ध लखनौ सामन्याला मावळ तालुक्यातील असंख्य वारकर्यांनी     आपल्या वारकरी  पोशाखात हजेरी लावलेली व अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते, मावळ तालुका  वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन व माजी अध्यक्ष शरद पवार यांच्याकदे अनेक वर्षांपासून  संत तुकाराम महाराज क्रिकेट स्टेडियम हे नामकरण व स्टेडियम आवारात भव्य 350 फूट उंचीचा तुकाराम महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी गेले अनेकवर्षांपासून सुरु होती परंतु अनेक  वेळा पाठपुरावा करूनही मागणी मान्य झालेली नसल्याने वारकर्यांनी अनोख्या पद्धतीने सर्वांचं लक्ष वेधले.

Lonavala News : लोणावळ्यात गुरूवार पासून शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजन 

‘मावळ तालुक्यालालाभलेले वैभव म्हणजे संत तुकाराम महाराज आणि अशा मावळ भूमी मध्ये आंतरराष्ट्रीय  पातळीचे क्रिकेट स्टेडियम (MCA Cricket Stadium) असल्याने त्याचे नाव सुद्धा संत तुकाराम महाराजस्टेडियम असेच हवे. ‘असे वक्तव्य वारकर्यांनी एमपीसी न्युजशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, सर्व वारकरी आपल्या रुबाबदार पोशाखात सामना पाहण्यासाठी आले असताना सर्वानी त्यांच्या सोबत  सेल्फी व फोटो घेण्यासाठी एकच गर्दी केलेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.