Pune News : भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 65 वर्षीय वॉचमनला अटक

एमपीसी न्यूज : भटक्या कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका विकृत व्यक्तीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. आरोपी हा मॉडेल कॉलनी परिसरातील एका सोसायटीत सुरक्षारक्षकाचे काम करत होता.

सोसायटीच्या गेटवर बसणाऱ्या भटक्या कुत्र्यांना रात्रीच्या वेळी उचलून घेऊन जात तो लैंगिक अत्याचार करायचा. एका प्राणिमित्र महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात 377 (अनैसर्गिक अत्याचार) नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

बाबुराव भाऊराव मोरे (वय 65, रा. जनता वसाहत, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एका 28 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मॉडेल कॉलनीतील एका उच्चभ्रू सोसायटीत आरोपी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी सोसायटीच्या गेट वर बसलेल्या का कुत्र्याला उचलून घेऊन जात त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केले होते. फिर्यादीने तेव्हा हा प्रकार पाहिला होता. परंतु आपल्याला कोणीतरी पहात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कुत्र्याला सोडून दिले होते.

त्याच्यानंतर फिर्यादीने त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर शनिवारी रात्री सुद्धा असाच प्रकार करताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्या विरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.