Pune Rain : पुण्यासह इतर जिल्ह्यात बरसणार पाऊस; विश्रांतीनंतर पावसाचे बाप्पासोबत आगमन

एमपीसी न्यूज : जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे (Pune Rain ) राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात पावसाचे आगमन झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.  झारखंडमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने आता पुढील पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. 

Maval : अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत उज्वला शिंदे प्रथम 

सप्टेंबरच्या सुरुवातीला पाऊस पडेल अशी अपेक्षा असतानाही पहिल्या दोन आठवड्यात पाऊस काही पडला नाही. त्यामुळे राज्यात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता.  आयएमडी पुणे कार्यालयातील हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी माध्यामाना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी सांगितले, की प्रामुख्याने रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर भागातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस शक्यता असल्याने आम्ही ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुढील दोन दिवस पुण्यामध्ये आकाश ढगाळ राहणार आहे. दिवसभरात हलका ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस (Pune Rain) पडेल. तसेच सोमवार आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कश्यपी यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.