Weather Report : पुणे, मुंबईत हलका, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of light rain in Pune, Mumbai, sparse rain in central Maharashtra

एमपीसी न्यूज – राज्यात गेल्या 24 तासांत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यात आज (दि.19) कमाल 29.6 अं.से. तर मुंबई मध्ये 33 अं.से. तापमान नोंदवण्यात आले. पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

# गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सें. मी. मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : श्रीवर्धन 20, मालवण 14, चिपळूण, सुधागड पाली 13 प्रत्येकी, भिरा 12, दापोली, मंडणगड, पेण, पोलादपूर 11 प्रत्येकी , गुहागर, पंजिम (गोवा), फोंडा, रत्नागिरी,संगमेश्वर देवरूख 9 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), दोडामार्ग, खेड, लांजा 8 प्रत्येकी, कानकोन, हर्णे, महाड, माणगांव, माथेरान, म्हसळा, राजापूर, रोहा, उरण 7 प्रत्येकी, मुरुड, केपे, सावंतवाडी, वैभववाडी 6 प्रत्येकी, कणकवली, सांगे 5 प्रत्येकी, अंबरनाथ, खालापूर, मुंबई (कुलाबा), पनवेल, ठाणे, उल्हासनगर 4 प्रत्येकी, अलिबाग, भिवंडी, दाभोलीम (गोवा) , देवगड, कर्जत, मडगव, मार्मगोवा, रामेश्वरी, वेंगुर्ला 3 प्रत्येकी, कल्याण, कुडाळ, पालघर 2 प्रत्येकी, शहापूर, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: गगनबावडा 9, पाटण, राधानगरी 7 प्रत्येकी, चांदगड, खंडाळा बावडा, महाबळेश्वर, वेल्हे 6 प्रत्येकी, लोणावळा (कृषी), पौड मुळशी 5 प्रत्येकी, आजरा, जावली मेढा, कराड, पन्हाळा, पारोळा, पुणे (लोहगाव), शाहूवाडी 3 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, कडेगाव, सातारा, श्रीगोंदा , वडगाव मावळ 2 प्रत्येकी.

मराठवाडा: माजलगाव 4, मुदखेड, परळी वैजनाथ, पाथरी, वडावणी 3 प्रत्येकी, बदनापूर, भूम, बिलोली, देवणी, गंगाखेड, जिराई, कळंब, लातूर, मानवत, नायगाव खैरगाव, उस्मानाबाद, पैठण, परतूर, सोनपेठ, तुळजापूर, उमारी, वाशी 2 प्रत्येकी.

विदर्भ: लाखनी 5, भंडारा, मोहाडी 4 प्रत्येकी, मौदा, सडकअर्जुनी, साकोली 3 प्रत्येकी, चांदूर बाजार, चिखलदरा, मोर्सी, पर्सेनी, सिरोंचा, तिरोरा, वरुड 2 प्रत्येकी.

घाटमाथा: शिरगाव 17, ताम्हिणी 16, डुंगरवाडी 14, कोयना (पोफळी), दावडी 12 प्रत्येकी, आंबोने 8, खोपोळी 7, कोयना (नवजा) 6, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), शिरोटा 5 प्रत्येकी, ठाकूरवाडी, वळवण 4 प्रत्येकी, वाणगाव, खंद 3 प्रत्येकी, भिवपुरी 1.

# पुढील हवामानाचा अंदाज व इशारा

येत्या दोन दिवसात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. आज आणि उद्या कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.