Weather Report : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता 

Chance of torrential rain in sparse places in Central Maharashtra, Marathwada and Vidarbha महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

एमपीसी न्यूज – दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : मुंबई (सांताक्रूझ) 19, पालघर 16, मालवण, मुरुड, उरण 15 प्रत्येकी, गुहागर, हर्णे, राजापूर 13 प्रत्येकी, दापोली 12, खेड, रामेश्वरी, रोहा 11 प्रत्येकी, चिपळूण, रत्नागिरी 10 प्रत्येकी, मंडणगड, पणजी (गोवा), पनवेल, श्रीवर्धन 9 प्रत्येकी, मार्मगोवा, पेण, वैभववाडी 8 प्रत्येकी, कणकवली, खालापूर, पेडणे, वालपोई 7 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), म्हापसा, मुळदे, पोलादपूर, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी ६, कानकोन, कर्जत, कुडाळ, मडगाव, माथेरान, म्हसळा, सुधागड पात्री, वसई 5 प्रत्येकी, अलिबाग, दोडा मार्ग, महाड, केपे, ठाणे, वेंगुर्ला 4 प्रत्येकी, सांगे 3, भिवंडी, डहाणू, जव्हार 2 प्रत्येकी, कल्याण, तलासरी, विक्रमगड, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 10, राधानगरी 9, महाबळेश्वर 8, चोपडा, यावल 7, भुसावळ, बोडावद, जळगाव 5 प्रत्येकी, अमळनेर, जामनेर, लोणावळा (कृषी), वाई 4 प्रत्येकी, भडगाव, दहिवडी माण, धरणगाव, एरंडोल, खटाव वडूज, पारोळा, रावेर, श्रीरामपूर, सोलापूर 3 प्रत्येकी, आजरा, इगतपुरी, कोरेगाव, मिराज, पन्हाळा, फलटण, सांगली, शाहूवाडी, शिरपूर, तासगाव 2 प्रत्येका, अक्कलकोट, अक्कलकुवा, आटपाडी, धुळे, दिंडोरी, गडहिंग्लज, इंदापूर, जाम खेड, जत, कागल, कराड, कवठे महाकाळ, कोल्हापूर, कोपरगाव, माढा, पाचोरा, पंढरपूर, पाटण, रहाटा, राहुरी शहादा, शिराळा, सिंध खेडा, तळोदा 1 प्रत्येकी.

मराठवाडा : अर्धापूर 10, धर्मबाद 7, अहमदपूर, औंढा नागनाथ, जळकोट, कैज, 6 प्रत्येकी, बिल्लोली, चाकूर, लोहा, नायगाव खैरगाव, रेणापूर ५ प्रत्येकी, भूम, लातूर, पालम, सोयगाव 4 प्रत्येकी, औसा, देगलूर, हिंगोली, माहूर, मुखेड , निलंगा, परळी वैजनाथ, शिरूर अनंतपाल, वाशी 3 प्रत्येकी, गंगाखेड, कळंब, मुदखेड, पाटोदा, तुळजापूर 2 प्रत्येकी, देवणी, कळमनुरी, किनवट, लोहारा, परभणी, पूर्णा, सेनगाव, सिल्लोड, सोनपेठ, उमरगा, वसमत 1 प्रत्येकी.

विदर्भ : जळगाव जामोद, मलकापूर 7 प्रत्येकी, बल्लारपूर, झरी झामनी 6 प्रत्येकी, अकोला, अमरावती, बाळापूर, दर्यापूर, हिंगणघाट, पोंभुर्णा, वरोर 5 प्रत्येकी, मारेगाव, नांदगाव काजी, नंदुरा, संग्रामपूर, सावनर, तिवासा 4 प्रत्येकी, अंजनगाव, बाटकुली, कारंजा लाड, मोताळा, नरखेडा, राजुरा, साओली, सेलू 3 प्रत्येकी, आर्वी, चिमूर, एटापल्ली, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, खामगाव, लाखनी, महागाव, मंगळुरपीर, मानोरा, मुल, नेर, पातूर, राळेगाव, समुद्रपूर, तेलहरा, वरुड 2 प्रत्येकी, अकोट, बार्शी टाकळी, भद्रावती, भंडारा, भिवापूर, चामोर्शी, चांदूर बाजार, चिखली, देवळी, धानोरा, दिग्रस, गडचिरोली, घाटंजी, गोंड पिपरी, कळंब, खारंघा, कोरची, कुही, कुरखेडा, मालेगाव, परटवाडा, पारशिवनी, पुसद, रिसोड, साकोली, उमर खेड, उमरेड, वणी, वाशीम 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (पोफळी) 11, ताम्हिणी 9, कोयना (नवजा), इुंगरवाडी 7 प्रत्येकी, शिरगाव 6, दावडी 5, लोणावळा (टाटा), वळवण, खोपोल्री 4 प्रत्येकी, लोणावळा (ऑफिस), अम्बोणे 3 प्रत्येकी, खंद, शिरोटा 2 प्रत्येकी, भिवपुरी 1.

पुढील हवामानाचा अंदाज :

16 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

17 जुलै : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

18-19 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

16 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

17-18जुलै :  कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

19-20 जुलै : कोकण गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.