Pimpri News: दंडाची पावती, फोटो सोशलमिडीयावर टाकून व्यापा-यांची बदनामी कशाला करता? – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांकडून प्लास्टिक कारवाईत दंड वसुल करताना साम, दाम, दंड इत्यादीचा वापर केला जातो. दंड वसुली करताना कर्मचारी उर्मट शब्दांचा वापर करतात. दंडाची पावती, व्यापा-यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले जातात. एखाद्याच्या मानवी चारित्र्याचे, प्रतिमेचे हनन केले जात आहे. दंड जरुर स्वीकारा परंतु, सोशलमिडीयावर फोटो अपलोड करुन व्यापा-यांची बदनामी कशाला करता. ते काय गुन्हेगार आहेत का? असा सवाल करत आयुक्त साहेब हे मात्र अति होत आहे. तुमच्या कर्मचा-यांना आवरा, नियंत्रणात ठेवा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नाईक यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्यासाठीची नियमावली देखील दिली. महापालिका प्रशासनाकडून कारवाई करताना नियमावलीचे पालन केले जात नाही. व्यापा-यांचे म्हणने पण ऐकूण घेतले जात नाही. त्यांचा पावती, दंड भरण्यासाठी नकार, विरोध नाही.

परंतु, महापालिकेचे कर्मचारी दुकानात एखाद्या गुंडांप्रमाणे घुसतात. व्यापा-यांवर दमदाठी करतात आणि पावती दंड भरण्याची सक्ती करतात. हे कर्मचारी म्हणजे एखाद्या टोळीतील गुंड आणि त्यांची कृती म्हणजे हप्ता वसुली करण्यासाठीच असावेत अशी शंका निर्माण होते. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे 70 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास परवानगी दिली आहे. तर, राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सरसकट प्लास्टिक वापराव बंदी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 70 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या मिळत नाहीत. त्यामुळे व्यापा-यांना नाईलाजास्तव कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक वापरावे लागत आहे. आई जेवु घालिना, बाप भीक मागू देईना अशी व्यापा-यांची सद्यस्थिती आहे. महापालिका कर्मचा-यांकडून दंड वसुलीत साम, दाम, दंड इत्यादीचा वापर केला जातो. दंड वसुली करताना कर्मचारी उर्मट शब्दांचा वापर करतात.

दंडाची पावती, व्यापा-यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला जातो. एखाद्याच्या मानवी चारित्र्याचे, प्रतिमेचे हनन केले जात आहे. आयुक्त साहेब हे मात्र अति होत आहे. तुमच्या कर्मचा-यांना आवरा, नियंत्रणात ठेवा. या कर्मचा-यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. दंड जरुर स्वीकारा परंतु, सोशलमिडीयावर फोटो अपलोड करुन व्यापा-यांची बदनामी कशाला करता. ते काय गुन्हेगार आहेत का? असा सवाल नाईक यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.