Talegaon Dabhade News : विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर बनावे ; प्राचार्य संभाजी मलघे यांचा सल्ला

एमपीसी न्यूज – विद्यार्थिनींनी निर्भय होण्यासाठी सकारात्मक विचार अंगिकारून विकास साधावा. सावित्रीबाई फुले यांच्यापासून अलौकीक आदर्श घेऊन आपल्या जीवनात निर्भय बनून क्रांतीकारक बदल घडवावा. तसेच विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर बनावे, असा सल्ला इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी मलघे यांनी दिला.

इंद्रायणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत शुक्रवारी (दि. 25) एकदिवसीय कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण सत्र शिबीर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संभाजी मलघे बोलत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.