Crime News : गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) दुपारी बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी येथे करण्यात आली.

सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी हे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात नेमणुकीस आहेत.बालाजीनगर झोपडपट्टी येथे राहणारी एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले.आरोपी महिलेकडे 21 हजार 375 रुपये किमतीचा 855 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा महिलेने आनंद उर्फ आप्पा काळे (रा. परंडा रोड, कुर्डूवाडी, जि. सोलापूर) याच्याकडून विकत आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.