Talegaon: गाडीत चोरीचे सामान मिळाल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण

Young man beaten on suspicion of stolen goods in shirgaon taluka maval talegaon

एमपीसी न्यूज- तुमच्या गाडीत चोरीचे सामान मिळाले आहे, असे म्हणत तरुणाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.26) दुपारी मावळ तालुक्यातील शिरगाव येथे घडली आहे.

अक्षय अशोक अर्जुने (वय 24, रा. शिरगाव) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केदार छगन वाघमारे (वय 26, रा. शिरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय वाहन चालक आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता ते घरी आले असता संशयित आरोपीने अक्षय यांना ‘तुमच्या गाडीत चोरीचे सामान मिळाले आहे’ असे म्हणत लाकडी काठीने मारले. यात अक्षय यांच्या मांडीवर, गुडघ्यावर दुखापत झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like