Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणाला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – आपल्याबद्दल आपल्या मित्रांना काहीही माहिती देतो, अशा संशयावरून एकाने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी चार वाजता पारशीचाळ, देहूरोड येथे घडली.

करण बलराज कागडा (वय 24, रा. पारशीचाळ, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहिदास भुंबक (वय 35, रा. पारशीचाळ, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कागडा हे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. फिर्यादी कागडा हे आरोपीच्या मित्रांना आरोपीबद्दल काहीही माहिती देतात, या संशयावरून आरोपीने कागडा यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.