रविवार, जानेवारी 29, 2023

Pimpri Crime : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज पानटपरी जवळ पान खात उभे असताना (Pimpri Crime) किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला.

याप्रकरणी करणसिंग चरणसिंग टाक (वय 19 रा.पिंपरी) याने पिपंरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून किरण डोंगरे (वय 17), विशाल घोडके (वय 18) प्रशांत डिगे (वय 27) सर्व राहणार मिलींदनगर, पिंपरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi News : कत्तलीसाठी गाय घेऊन जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी केले अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टपरीजवळ पा खात उभा असताना आरोपी तेथे आले व त्यातील किरण याने फिर्यादीला तू माझ्या बद्दल सर्वांजवळ वाईट का बोलतो म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांनी शिव्या का देतोस असा जाब विचारला असता (Pimpri Crime) किरण याचे दोन साथीदार आरोपी तेथे आले व त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी किरण याच्या हातातील कोयता फिर्यादीच्या हाताला लागला व हातातून रक्त वाहू लागले. हे पहाताच आरोपी तेथून पळून गेले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest news
Related news