Dighi News : कत्तलीसाठी गाय घेऊन जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज कत्तलीसाठी निर्दयीपणे गाय घेऊन जाणाऱ्या तिघांना (Dighi News) दिघी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.5) वडमुखवाडी येथे घडला आहे.

याप्रकऱणी पोलीस नाईक अनिल रामचंद्र शिंदे (वय 35) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी लक्ष्मण सुरुदेव गायकवाड (वय 38 रा.मोशी), संदिप पंढरीनाथ तापकीर (रा.चऱ्होली) रामेश्वर भगवान फुले (वय 41 रा.चऱ्होली) यांना अटक केली असून शाबीर कुरेशी (रा. पिंपरी) हा अद्याप फरार आहे.

Thergaon News : हुंड्यात घर दिले नाही म्हणून जमलेले लग्न मोडले, वर पक्षावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामेश्वर याने त्याची गाय 9 हजार 500 रुपयांना लक्ष्मण याला विकली, त्याने ती त्याचा दोस्त रामेश्वर फुले याच्या टेम्पोमध्ये (एमएच 14 सीपी 8072) जनावर वाहतूकीचा कोणताही परवाना नसताना गाडीमध्ये बांधून ती कत्तलीसाठी पाठवली. (Dighi News) यावेळी तिला चारा पाणी न देता तिचे हाल केले. ती पुढे शाबीर याच्याकडे कत्तलीसाठी पाठवली जात होती. यावोळी पोलिसांनी वडमुखवाडी येथून तिला ताब्यात घेतले. आरोपींवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.