Sangvi : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या वाहनाने तरुणीच्या गाडीला जोरात धडक दिली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली हा अपघात 18 जानेवारी रोजी दुपारी पाचच्या सुमर्स ढोरे ब्रिजवर सांगवी येथे घडला. याप्रकरणी बुधवारी (दि. 5 फेब्रुवारी) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिया विनोद अत्री (वय 32) असे जखमी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पूजा गौरव कोहली (वय 36, रा. ताथवडे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी रोजी जखमी तरुणी प्रिया त्यांच्या गाडीने जात होत्या. त्या सांगवी येथील ढोरे पुलावर आल्या असता त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये प्रिया यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.