Moshi News : घराची जुनी भिंत शेजारील पत्र्याच्या रूमवर पडल्याने रूममधील दोघे मृत्युमुखी

एमपीसी न्यूज – मोशीमध्ये घराची जुनी भिंत शेजारील पत्र्याच्या रूमवर पडल्याने रूममधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे म्हणाले की, ही घटना मोशीमधील साईकृपा कॉलनी तापकीर नगर येथे घडली आहे. एक घर मालक त्याचे बैठे घराच्यावरती आणखी एक मजला बांधत होता.बांधकाम पूर्ण झाले होते पण फक्त प्लास्टरचे काम बाकी होते.मास्टरचे काम करण्यासाठी कामगारांनी जुन्या पहिल्या मजल्यावरील जिन्याजवळची जुनी अर्ध्या  भिंतीत आधारासाठी बांबू बसवले होते.आज प्लास्टरचे काम चालू असताना ही भिंत खाली कोसळली.ही भिंत शेजारील पत्र्याच्या रूमवर पडली. त्या

रूममध्ये असलेल्या दोन युवकांवर ही भिंत कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले होते.उत्तम मोरे, (वय 33) याला संतनगर मोशी येथील एक्वा रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मेहबूब (वय  30) याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण (वाय.सी.एम) रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.प्लास्टरचे काम करणारे दोन कामगारसुद्धा भिंती  बरोबर खाली कोसळले होते.त्यांना किरकोळ खर्चटले असल्यामुळे त्यांच्यावर प्रथमोपचार करून सोडण्यात आले आहे.याप्रकरणी घर मालकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.