Chinchwad: धनगर समाजाचा उद्या रहाटणीत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा

एमपीसी न्यूज – पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने उद्या (रविवारी) राज्यस्तरीय बाराव्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

रहाटणी, रामनगर येथील थोपटे लॉन्समध्ये उद्या (रविवारी) सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‌घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश शेंडगे असणार आहेत.

_PDL_ART_BTF

महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, संजय जगताप, सुनील शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, भाजप प्रवक्ते गणेश हाके, ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, मल्हार सेनेचे लहु शेवाळे उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संघाचे सचिव विजय भोजने यांनी दिली.

मेळाव्याचे संयोजनात अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर, कार्याध्यक्ष दिलीप काटकर, सचिव विजय भोजने, खजिनदार अभिमन्यू गाडेकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र पिसे, संचालक गणेश लंबाते, राजेंद्र कवितके, विठ्ठल कडू, दर्शन गुंड, पांडुरंग उराडे, विजयराज पिसे यांनी पुढाकार घेतला आहे. या वधू-वर मेळाव्यास समाजातील सर्व शाखेतील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.