Panshet Dam News : पानशेत धरणातून 1527 क्युसेक विसर्ग चालू 

एमपीसी न्यूज : पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करून सकाळी 11 वाजता सांडव्याद्वरे 977 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 550 क्युसेक असा एकूण 1527 क्युसेक करण्यात येत आहे, असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

पानशेत धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात वाढ होत आहे. येत्या 2-3 तासांमध्ये नदीपात्रामध्ये विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.

पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे.आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.