_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Maval Corona Update : मावळात 22 रुग्णांची नोंद; 12 जणांना डिस्चार्ज

22 patients reported in Maval,12 persons discharged. लोणावळा आणि वडगाव येथे आज एकही रुग्णाची नोंद नाही

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 27) 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण आकडा 613 झाला आहे. तर आज 12 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 8 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 14 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये चांदखेड आणि कुसगाव प.मा.(पवन मावळ) येथील प्रत्येकी एक, कान्हे, सुदवडी येथील प्रत्येकी दोन, सुदुंबरे आणि बऊर येथील प्रत्येकी चार रुग्ण आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शहराती भागात सापडलेले आठ रुग्ण हे तळेगाव शहरातील आहेत. लोणावळा आणि वडगाव येथे आज एकही रुग्णाची नोंद नाही.

एकूण 613 रुग्णांमध्ये सध्या 375 रुग्ण सक्रीय आहेत. तर 224 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयात 188 आणि होम आयसोलेशनमध्ये 187 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.