India Corona Update : देशात 30.27 लाख सक्रिय रुग्ण, 24 तासांत 2,59,591 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 देशात तासांत 2 लाख 59 हजार 591 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 30 लाख 27 हजार 925 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 57 हजार 995 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मागील 24 तासांत 4 हजार 209 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 91 हजार 331 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 87.24 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 32 कोटी 44 लाख 17 हजार 870 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 20 लाख 61 हजार 663 चाचण्या गुरुवारी (दि.20) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 14 कोटी 91 लाख 41 हजार 874 जणांना पहिला डोस तर, 4 कोटी 26 लाख 68 हजार 730 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.