Pune News : पुण्यात गुटख्याचा कंटेनर पकडला, 46 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज : हडपसर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री सोलापूर महामार्गावर गुटख्याने भरलेला एक आयशर कंटेनर पकडला. या कारवाईत पोलिसांनी 46 लाखांचा गुटखा आणि 20 लाखांचा टेम्पो असा 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहन चालक सामीउल्लाह मुर्जता हुसेन (वय 51) त्याला अधिक चौकशीसाठी हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर विजापूर आणि निपाणी येथून आला असून तो फुरसुंगी परिसरातील एका गोडावूनकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून गुटख्याने भरलेला हा कंटेनर ताब्यात घेतला.

या कंटेनरमध्ये 350 पोत्यामध्ये तब्बल 46 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला आहे. पोलिसांनी या गुटख्यासह कंटेनर ही जप्त केला आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.