BNR-HDR-TOP-Mobile

Maval : लोकसभेसाठी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहणार; राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणूक जातीयवादी पक्ष असलेल्या भाजप विरोधात लढायची आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघातून पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घेतली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व लोकसभेसाठी इच्छुक असलेले संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी शिरुर आणि मावळ मतदार संघातून पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पक्षाने कामाला देखील सुरुवात केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणूक लढविणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. पार्थ यांचा मावळ मतदारसंघात राबता देखील वाढला आहे. त्यामुळे त्याला पुष्टी देखील मिळत आहे.

याबाबत विचारले असता संजोग वाघेरे म्हणाले, ”लोकसभेचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नाहीत. मावळ मतदार संघातून पक्ष ज्याला उमेदवार देईल त्याच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. पवार साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असणार आहे”.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, ”मी आणि वाघेरे देखील लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहोत. परंतु, पक्ष जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असणार आहे. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. आगामी लोकसभा निवडणूक जातीयवादी पक्ष असलेल्या भाजप विरोधात लढायची आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. तसेच लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे मावळात परिवर्तन होणार” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.