Maval : पार्थ पवार यांनी लोकलने प्रवास करत प्रवाशांचे जाणून घेतले प्रश्न

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-शेतकरी स्वाभिमानी संघटना आणि रिपाइं आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज (बुधवारी) लोकलने प्रवास केला. सीएसटी ते पनवेल दरम्यान प्रवास करतच पार्थ यांनी प्रवाशांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रचार केल्यानंतर पार्थ पवार आज घाटाखाली असलेलल्या पनवेल, उरण, कर्जत परिसरात प्रचाराला गेले आहेत. त्यांनी लोकने प्रवास केला. लोकलने प्रवास करताना त्यांनी प्रवाशांसोबत संवादही साधला. सीएसटी ते पनवेल लोकलने प्रवास करून प्रवाशांसोबत तसेच कॉलेज तरुण-तरुणीं सोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.