Chinchwad : बिजलीनगर येथे चोरट्यांनी साडीचे दुकान फोडले
एमपीसी न्यूज – बिजलीनगर येथील महालक्ष्मी साडी सेंटर नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातून 36 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आली.
सीता भाऊसाहेब पाटील (वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचे महालक्ष्मी साडी सेंटर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी पाटील यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 36 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.