Pune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
एमपीसी न्यूज – बोपोडी येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना रविवारी (दि.28) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला या भाऊ-पाटील रोडने पायी चालत जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. या झटापटीत मंगळसुत्रातील 12 हजार रुपयांचे मणी चोरट्यांनी पळवले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.